मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन ठाकरे कुटुंबियांच्या १९ बंगल्य...
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन ठाकरे कुटुंबियांच्या १९ बंगल्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करून या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. आता सोमय्या यांनी १९ बंगल्यांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तेव्हाचे ठाकरे सरकारने आपल्या पदाचा, अधिकारांचा दुरुपयोग करुन शासकीय नोंदींमध्ये व दस्तऐवजांमध्ये खाडाखोड आणि फेरफार केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. हा घोटाळा असल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
COMMENTS