सांगली / नगर सहयाद्री सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ग्रामपंचायत परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दोन तरुणांकडून १ कोटी...
सांगली / नगर सहयाद्री
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ग्रामपंचायत परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दोन तरुणांकडून १ कोटी ५ लाख रुपये किंमतीच्या २ किलो सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत.दोन्ही संशयित कवलापूर येथील असून त्यांनी संबंधित सोने जालना येथील सराफाचे असल्याची कबुली दिलीय.या सोन्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सादर करता न आल्याने ते जप्त करण्यात आले. रोहित तानाजी चव्हाण (वय २७) आणि संतोष अशोक नाईक (वय २६) अशी संशयिताची नावे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गस्त घालून संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात होते.एक पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक इम्रान मुल्ला, सचिन धोत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.पोलिसांना कवलापूर ग्रामपंचायतीसमोर गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे जर्किन घातलेले दोघे तरुण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने तातडीने कवलापूर ग्रामपंचायत परिसरात छापा टाकून रोहित चव्हाण आणि संतोष नाईक या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेण्यात आली.रोहितच्या पँटच्या खिशात १०० तोळे (एक किलो), तर संतोषकडे ९९. ४ तोळे अशा दोन किलोच्या सोन्याच्या विटा मिळून आल्या. त्यांची किंमत तब्बल १ कोटी ५ लाख ६८ हजार रुपये आहे.सोन्याबाबत पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली. हे सोने बांबवडे येथील सराफी मित्र विक्रम लक्ष्मण मंडले (सध्या रा. जालना) यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS