मुंबई वृत्तसंस्था टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंतच्या गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला.या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.देहरादूनमधील म...
मुंबई वृत्तसंस्था
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंतच्या गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला.या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ऋषभच्या कारचा अक्षरश:चुराडा झाला.ऋषभने क्रिकेटच्या विश्वात स्वत:ची जबरदस्त छाप सोडली.तो त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो.आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. ऋषभ पहिल्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप २०१६ मध्ये भारताकडून खेळताना दिसला.तेव्हा १८ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं होतं.२०२० मध्ये २९.१९ कोटी रुपयांची कमाई केली होती.तर २०२१ मध्ये त्याच्या संपत्तीचा आकडा ५ दशलक्ष डॉलर्स इतका होता.सध्या तो जवळपास ८.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७० कोटी रुपये) संपत्तीचा मालक आहे.
ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ऋषभची चांगली कमाई होते. Dream 11, RealMe, Boat, SG, Noise आणि Cadbury यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती तो करतो.यातून वर्षभरात त्याची दोन दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई होते. ऋषभ हा मूळचा उत्तराखंडचा आहे. मात्र आता तो दिल्लीत राहतो.
COMMENTS