अहमदनगर । नगर सह्याद्री नगरच्या तारकपूर परिसरातील सिटी केअर हॉस्पिटल येथे हृदयरोगावरील अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगरच्या तारकपूर परिसरातील सिटी केअर हॉस्पिटल येथे हृदयरोगावरील अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत. नगरसह राज्यातील रूग्णांना या सुविधांचा लाभ होतो. याशिवाय जास्तीत जास्त रूग्णांना सेवेचा लाभ मिळण्यासाठी गुरुवारी (दि. १५) मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. दुपारी २ ते ३.३0 या वेळेत होणार्या शिबिरात ग्रँट मेडिकल फौंडेशन, रुबी हौल क्लिनिक पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सीनियर मॅनेजर संतोष दसासे यांनी दिली.
मोठ्या महानगरांप्रमाणेच नगरमध्येही अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सिटी केअर हॉस्पिटल येथे विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी ९२०९६३२५०२,७३८५१९५९६२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सीटी केअर हॉस्पिटलने केले आहे.
COMMENTS