जयपूर फूट व कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिरास भेट अहमदनगर | नगर सह्याद्री रोटरी लब ही संस्था जागतिक पातळीवर काम करणारी आहे. या संस्थेने समा...
जयपूर फूट व कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिरास भेट
अहमदनगर | नगर सह्याद्री
रोटरी लब ही संस्था जागतिक पातळीवर काम करणारी आहे. या संस्थेने समाजातील वंचित घटकांना मदत करीत अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेत समाजाची सेवा केली. नगर येथे दोन दिवशीय जयपूर फूट व कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिराचे आयोजन करून अनेकांना त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे करण्याचे श्रेय त्यांना जाते. रोटरीसारख्या सामाजिक भान जपणार्या संस्था समाजात कार्यरत असल्यामुळेच अनेक प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व रोटरी लब व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) आयोजित जयपूर फूट व कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिरास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी रो. पुरुषोत्तम जाधव, रवी डिक्रुज, प्रांतपाल गीता गिल्डा, नीलमणी गांधी, संध्या पांडे, मधुरा झावरे, कौशिक कोठारी, महावीर मेहेर, प्रशांत बोगावत, मरलिन इलिशा, रो. मधूर आदी उपस्थित होते.
वाघ म्हणाल्या, समाजातील प्रश्न सुटण्यासाठी सामाजिक संघटना योगदान देत आहेत. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावेनतून हे सर्वजण कार्यरत आहेत. अनेकांना जीवनदान देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोटरीने नेहमीच प्रयत्न केले आहेत. जयपूर फूट व कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देते, असे त्या म्हणाल्या.
रो. पुरुषोत्तम जाधव यांनी चित्रा वाघ यांचे स्वागत करून शिबिराचा लाभ सुमारे ३५० नागरिकांनी घेतल्याचे सांगितले. या सर्वांना जयपूर फूट किंवा कृत्रिम हात बसविण्यात येत आहेत. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून, सर्व रोटरी लब एकत्र येऊन हे शिबिर आयोजिले. शिबिरांच्या माध्यमातून २ हजार लोकांना कृत्रिम हात-पाय देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
COMMENTS