पालक झाल्यानंतर व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक बुद्धिमान बनते. गोष्टी अधिक बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करते.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या महिन्यातच आई-वडील झाले आहेत. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. नीतू कपूर यांनी मुलीचे नाव राहा ठेवले होते. आई-वडील झाल्यानंतर रणवीर आणि आलियाच्या आयुष्यात अनेक बदल घडले आहेत. रणबीर कपूरने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान वडील झाल्यानंतरचे त्याचे अनुभव शेअर केले आणि यासोबतच त्यांनी स्वतःबद्दल असुरक्षित वाटत असल्याचेही सांगितले.
रणबीर कपूरने एका मुलाखतीत त्यांनी चित्रपट, पालकत्व आणि इतर अनेक गोष्टींबद्दल बोलले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी वडील झाल्यानंतरची सर्वात मोठी असुरक्षितता देखील उघड केली.
मुलाखतीदरम्यान जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की, मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला आहे. त्याच्या उत्तरात ते म्हणाले, 'मला एवढा वेळ का लागला, मला आधी वडील व्हायला हवे होते, माझी मुलगी २० वर्षांची झाल्यावर मी ६० वर्षांचा होईल. मला माझ्या मुलीसोबत फुटबॉल खेळता येईल का? मी तिच्याबरोबर पळू शकेल का? मात्र, हा निश्चितच वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे, जो अद्याप जाणवला नाही, असेही ते म्हणाले.
रणवीरने मुलीच्या संगोपनाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, आलिया आणि मी आम्ही दोघे मिळून बाळासाठी वेळ काढू. आलिया कामावर गेल्यावर मी बाळासोबत राहणार आहे. आणि जेव्हा मी कामावर असेल तर आलिया घरी हजर असेल. रणबीरने असेही सांगितले की, पालक झाल्यानंतर व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक बुद्धिमान बनते. गोष्टी अधिक बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करते.
COMMENTS