अहमदनगर । नगर सह्याद्री जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व अहमदनगर महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धेत श्री रामकृष...
अहमदनगर । नगर सह्याद्री
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व अहमदनगर महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धेत श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दणदणीत यश मिळवून मैदान गाजवले.
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे ही विशेष लक्ष दिले जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील. त्यासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अजित लोळगे व दीपक धनवटे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यावर्षी आंतरशालेय स्पर्धेत विद्यालय व महाविद्यालयातून 380 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व घवघवीत यश संपादन केले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 110 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच 69 विद्यार्थ्यांची विभागीय स्तर या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत शाळेच्या सेपाक टकरा या स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुले व मुली व 19 वर्षे मुली अशा एकूण पाच संघांना विजेतेपद पटकावले. तसेच जुनियर कॉलेज 19 वर्षे डॉल बॉल मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावून विभागस्त स्पर्धेसाठी निवड झाली.
क्रिकेट 17 वर्षे मुले व मुली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला तर बॅडमिंटन 17 व 19 वर्षे संघाने द्वितीय क्रमांक मिळवला 14 वर्षे गटाने तृतीय क्रमांक पटकावला तर वैयक्तिक टेनिस बुद्धिबळ की बॉक्सिंग बॉक्सिंग कुस्ती व मैदानी किक बॉक्सिंग कुस्ती व मल्लखांब, रोलर स्केटिंग, योगासने, जुदो, तलवारबाजी, मैदानी खेळ या स्पर्धेत प्राविण्य मिळवून विभाग स्पर्धेत प्रवेश मिळवला.
संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, राजेश झंवर, सचिव डॉक्टर शरद कोलते, सहसचिव बजरंग दरक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य राधिका जेऊरकर, माध्यमिक विभागाच्या समन्वयक अंजना पंडित कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक संपदा देशपांडे व प्राथमिक विभागाच्या अनुरिता झगडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केल
COMMENTS