जामखेड । नगर सह्याद्री एमआयडीसी मंजूर झाली असेल तर त्याचा शासन निर्णय काय झाला ही माहिती पत्रकारांना व सोशल मिडियावर टाकली पाहिजे. अडीच वर्...
जामखेड । नगर सह्याद्री
एमआयडीसी मंजूर झाली असेल तर त्याचा शासन निर्णय काय झाला ही माहिती पत्रकारांना व सोशल मिडियावर टाकली पाहिजे. अडीच वर्षे सत्ता असताना ते जमले नाही. आता लोक प्रश्न विचारतील म्हणून या भावनेने विधानमंडळात प्रश्न उपस्थित केला व त्या अनुषंगाने मतदारसंघात एमआयडीसी आणली अशी बातमी केली. असा माझा समज आहे. कारण तसा समज नसता तर सोशल मिडियावर शासनाचा निर्णय अगर जीआर टाकला असता अशा पध्दतीने भुलथापा मारणे बंद करा अशी टीका आ. राम शिंदे यांनी आ. रोहीत पवार यांच्यावर शनिवारी चोंडी येथे केली.
कर्जत जामखेड मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार शनिवारी आ. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी आ. राम शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
राजकारणाच्या आजपर्यंतचा इतिहास कोणतेही गोष्ट मंजूर झाली तर त्याचा निर्णय आपण सोशल मिडियावर टाकतो. त्यांनी एमआयडीसी मंजूर झाली असल्या भपा-या हाणने बंद केली पाहिजे. आपण जामखेड शहर व सात वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना 250 कोटीची मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आणली त्यास मुख्यमंत्री कार्यालयाने पाच तासात आँर्डर दिली ती मी सोशल मिडियावर टाकली अशी माझ्या कामाची पद्धत आहे.
एमआयडीसी बाबत शासनाचा निर्णय नाही जीआर नाही तोच यांनी मंजूरीचा दावा केला. जे काय आहे ते स्पष्ट असले पाहिजे. पारदर्शक पाहिजे. लोकांना अश्वासीत केले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. आपली सत्ता असताना आपले सरकार असताना काही नाही करू शकलेले लोकप्रतिनिधी आता केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. करायचे असेल होणारच असेल तर मी आणि माझे सरकार कटिबद्ध आहे. येणार्या कालखंडात ते आम्ही करून दाखवू असे आव्हान आ. राम शिंदे यांनी दिले.
यावेळी भाजपाचे विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, जेष्ठ कार्यकर्ते काकासाहेब धांडे, सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचारणे, भाजपा जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशीद, कर्जतचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, ऋषिकेश मोरे, माजी सभापती बाप्पु शेळके, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, मंगेश पाटील, गोरख घनवट, प्रवीण चोरडीया, प्रवीण सानप, दादासाहेब वारे, वैजीनाथ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS