पुणे / नगर सहयाद्री आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन करणार आहे.दुसऱ्...
पुणे / नगर सहयाद्री
आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन करणार आहे.दुसऱ्या दिवशीसहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे. याशिवाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत.राज ठाकरे मागील अनेक दिवसांपासून पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.कोकण त्यानंतर विदर्भ आणि आता ते तीन दिवस पुण्यात असणार आहे.
राज ठाकरे आज (२७ डिसेंबर) पुण्यात तीन पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे.त्यासोबतच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.पुण्यातील मनसेत काही दिवसांपासून अंतर्गत वादावादी सुरु आहे.त्यामुळे फूट पडली आहे.पुणे शहरातील मनसेचे अंतर्गत वाद सध्या चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत.त्यामुळे मनसेत दोन गट निर्माण झाले आहे. पुण्यातील मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे मागील काही दिवसांपासून मनसेच्या निर्णयावर नाराज असल्याचं चित्र आहे.त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन वेळा वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी चर्चेसाठी बोलवून घेतलं होतं.मात्र नाराजी कायम होती.
माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही, असं पत्रक सोशल मीडियावर शेअर करत राज ठाकरे यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वॉर्निंग दिली आहे.ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या, असं देखील त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
COMMENTS