मुंबई वृत्तसंस्था राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अ...
मुंबई वृत्तसंस्था
राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे.
काहीवेळा पूर्वी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले.भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत.आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे.यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे.
या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले.नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे.
COMMENTS