पुणे /नगर सहयाद्री ३१ डिसेंबर रविवार आणि शनिवारी आल्याने पुण्यात जोरदार सेलिब्रेशन होणार आहे.नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण स...
पुणे /नगर सहयाद्री
३१ डिसेंबर रविवार आणि शनिवारी आल्याने पुण्यात जोरदार सेलिब्रेशन होणार आहे.नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष ३१ डिसेंबरला निर्बंध घालण्यात आले होते.राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे पुणेकरांचा ३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन जोरात होणार आहे. पुणेकरांकडून "वन डे परमिट" साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी परवाने दिले आहे.
पुणेकरांना नव वर्ष साजरं करण्यासाठी चांगलीच मुभा मिळाली आहे. वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे.त्यामुळे अनेकांनी खरेदी केले आहेत.या सगळ्या मद्यप्रेमींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ३१ डिसेंबरला करडी नजर असणार आहे.परवान्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे.
विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नेहमीची १४ तर १० विशेष पथकं यंदा पुणेकरांवर नजर ठेवणार आहे.डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात २४० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासोबत १७ वाहनं जप्त करण्यात आले आहेत तर ५० लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
COMMENTS