पुणे / नगर सहयाद्री : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आह...
पुणे / नगर सहयाद्री :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत. व्यापारी संघाने देखील पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील सगळी दुकानं तीन वाजेपर्यंत बंद असणार आहेत.राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे.त्यांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला आहे
पुणे बंदमुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय. एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.राज्यपालांविरोधात व्यापारी संघटनांनंतर आता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.त्यामुळे राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळणार असल्याचं चित्र आहे.स्कूल व्हॅन चालकांनी बंदला पाठिंबा दिल्यानं शाळा बंद आहेत. शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलय.मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.हॉटेल्स बंद राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.सर्व प्रकारच्या सगटनंही बंद ला प्रतिसाद देत आहे. यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे १०० वरिष्ठअधिकारी,१००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
COMMENTS