नवी दिल्ली । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन आज सकाळी पहाट झाले आहे. आज (30 डिसेंबर) पहाटे साडेती...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन आज सकाळी पहाट झाले आहे. आज (30 डिसेंबर) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. आईच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान मोदी अहमदाबादकडे रवाना झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या आई हिराबेन मोदी यांच्या आठवणीत एक भावूक ट्विट केले आहे.
मी जेव्हा आईच्या १०० व्या वाढदिवशी त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. 'बेटा काम करो बुद्धी से और जीवन जिओ शुद्धी से' ही गोष्ट माझ्या नेहमीच लक्षात राहिले असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यावरून मोदी आई त्यांच्या आई हिराबेन यांच्यातील नाते किती घट्ट होते याची प्रचिती मिळते आहे.
नरेंद्र मोदी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते अहमदाबाद येथे पोहचले आहे. बुधवारी मोदी हे आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे आईच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
त्या लवकरच बऱ्या होतील, असे डॉक्टरांनी मोदींना सांगितले होते. मात्र, आज (30 डिसेंबर) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.
मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले आहे. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेनचे आशीर्वाद घेताना दिसले होते.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
COMMENTS