मुंबई । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले आहे. यावेळी मोदींच्या हस्ते 75 हजार कोटींच्या विक...
मुंबई । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले आहे. यावेळी मोदींच्या हस्ते 75 हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले आहे.विविध विकासकामांना मोदींना नक्षत्राची उपमा दिली आहे. तसेच या सर्वांना नागरिकांना मोठा फायदा होईल असे म्हटले आहे.
आज महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मोठं नक्षत्र उदयास येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 वर्षात 75 हजार कोटींची विकासकामे झाल्याबद्दल महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे. डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात किती वेगाने काम करत आहे. याचा हा पुरावा आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी होणार असून, महाराष्ट्रातील 24 जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हिटीने जोडणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या 8 वर्षात आम्ही आमची विचारसरणी आणि दृष्टिकोन दोन्ही बदलले आहे. आम्ही 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास' यावर भर देत आहोत. मी जेव्हा 'सबका प्रयास' म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक देशवासीय आणि राज्याचा समावेश होतो. लहान असो वा मोठा, प्रत्येकाची क्षमता वाढेल तरच भारत विकसित होईल, असं देखील मोदींनी म्हटले आहे.
विकासाच्या नक्षत्राबद्दल माहिती देताना मोदींनी म्हटले की, पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. दुसरा तारा नागपूर एम्स आहे. ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल. तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे.
चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेलं आयसीएमआरचे रिसर्च सेंटर, पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर. सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प, सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन.
आठवा प्रकल्प नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस, नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प, दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प, बारावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचे लोकार्पण आहे.
COMMENTS