नवी दिल्ली । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रीची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अहमदाबाद रुग्णालयात दाखल केलं आहे. मोदी आणि...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रीची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अहमदाबाद रुग्णालयात दाखल केलं आहे. मोदी आणि हिराबा यांचा हा फोटो 4 डिसेंबरचा आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान मोदी गांधीनगरला मतदानासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी जाऊन आईला भेटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हिराबा यांना मंगळवारी रात्री अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिराबा यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. गुजरात निवडणुकीपूर्वी 18 जून रोजी मोदींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती.
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना, 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता मातोश्री हिराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यावेळी पीएम मोदींनी त्यांच्यासोबत खिचडीही खाल्ली होती.
COMMENTS