पारनेर । नगर सह्याद्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाचे जिल्हास्तरीय विभागीय अविष्कार संशोधन 2022 स्पर्धेमध्ये औरंगाबाद येथे म...
पारनेर । नगर सह्याद्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाचे जिल्हास्तरीय विभागीय अविष्कार संशोधन 2022 स्पर्धेमध्ये औरंगाबाद येथे मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक-10 डिसेंबर 22 रोजी अहमदनगर व औरंगाबाद जिल्हास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाचे विभागीय आविष्कार संशोधन 2022 स्पर्धा पार पडली त्यामध्ये विविध ठिकाणावरील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यामध्ये मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला होता, त्यात कॉलेज मधील बी. फार्मसीचा अक्षय नेहे याने गोल्ड पदक, चंद्रकांत घंगाळे व अभिषेक पानगे याने सिल्वर पदक संपादन केले, तसेच देवसान भक्ती, जाधव रविंद्र, शिंदे हृतुजा,अबुज आकांक्षा या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मिराबाई आहेर, सचिव किरणशेठ आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दिपक आहेर, खजिनदार. बाळासाहेब उंडे, संचालिका शितल आहेर, संचालिका स्वेतांबरी आहेर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच यासाठी प्राचार्य डॉ. गोरडे प्रसाद, पदवी विभाग प्रमुख डॉ. रहाणे राहुलकुमार, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा. वैभव कदम, प्रा. योगेश मुसळे व विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
COMMENTS