पारनेर तालुयातील पुरोगामी संघटना आक्रमक पारनेर | नगर सह्याद्री महापुरुषाबद्दल बेताल व अपमानजनक वक्तव्य करणार्या व्यक्तीचा जाहीर तीव्र निष...
पारनेर तालुयातील पुरोगामी संघटना आक्रमक
महापुरुषाबद्दल बेताल व अपमानजनक वक्तव्य करणार्या व्यक्तीचा जाहीर तीव्र निषेध व त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा. या करीता पारनेर तालुयातील सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, छत्रपती क्रांती सेना, महात्मा फुले समता परिषद, चर्मकार विकास महासंघ , पारनेर तालुका राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने लेखी निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात आणि महाराष्ट्र मध्ये भाजपा व त्यांचे राज्यपाल, खासदार, आमदार हे सत्तेच्या जोरावर सातत्याने बेताल वक्तव्य करून आमच्या महापुरुषांचा सतत अपमान करत आहेत. या अगोदर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वर तर काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. तर आता मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून सदर महापुरुषांचा अपमान केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे वाचाळविर जाणीव पूर्वक आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहेत. यांचा आम्ही विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. तसेच बेताल वक्तव्य करणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
COMMENTS