माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्यतिथी साजरी निघोज । नगर सह्याद्री माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्याच्या वि...
निघोज । नगर सह्याद्री
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असून सहकार, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती होउन सर्वसामान्यांना फायदा झाला असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
वराळ पाटील यावेळी म्हणाले प्रवरा संस्थेच्या माध्यमातून विखे पाटील यांनी शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार क्षेत्राला पूरक असे साम्राज्य निर्माण केले असून या माध्यमातून राज्यातील ग्रामीण असो वा शहरी जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. नगर व प्रवरानगर येथील हॉस्पिटल माध्यमातून राज्यातील लाखो रुण्गांना चांगली सेवा मिळत आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्याचा विकास झाला आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांचा समर्थ वारसा चालवण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज राज्याचा विकास मोठ्या प्रमाणात होत असून नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचे काम विखे पाटील यांनी केले आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन वराळ पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, वडनेरचे माजी सरपंच शिवा पवार, सोसायटीचे चेअरमन भागाजी बाबर, ठेकेदार सागर डोकडे, शुभम लाळगे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक श्रीकांत पवार आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS