औरंगाबाद / नगर सहयाद्री राज्यातील सर्व महापालिकाआणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानग्यांसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस ही ऑनलाइन सिस्टीम...
राज्यातील सर्व महापालिकाआणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानग्यांसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस ही ऑनलाइन सिस्टीम सहा दिवसांपासून बंद पडली आहे.
त्यामुळे राज्यभरातील हजारो बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत.तर एकट्या औरंगाबाद महापालिकेत गेल्या सहा दिवसांत पन्नासहून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
नगरविकास विभागाने १ एप्रिल २०२२ पासून सुरू केली.मात्र या वेबसाईटमध्ये काही त्रुटी येऊ लागल्याचे समोर आले.तर साइटमधील त्रुटी काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या त्रुटी काही दूर झाल्या नाहीत, मात्र २१डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.
जुलै 2022 पासून सक्तीने महाआयटीने तयार केलेल्या बीपीएमएस साइटवरच आर्किटेक्ट यांना बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करावी लागत आहे. पण साइटवर बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करतांना अनेक अडचणी येत होत्या.साइट स्लो चालणे, नेटवर्क न मिळणे, बांधकामाचे मोठे ड्रॉइंग अपलोड न होणे, वारंवार साइट हँग होणे अशा तक्रारी आहेत. अशातच आता २१ डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.
COMMENTS