मुंबई / नगर सह्याद्री : सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या ५ वर्षीय मुलासह सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केल...
मुंबई / नगर सह्याद्री :
सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या ५ वर्षीय मुलासह सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. आरती विजेंद्र मल्होत्रा असं मृत महिलेचं नाव आहे. तर अरवीक असं गंभीर जखमी मुलाचं नाव आहे.घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर मुलगा गंभीर जखमी आहे.
पोलिसांना या प्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. जानेवारी २०१६ मध्ये आरतीचा विवाह विंजेंद्र याच्याशी झाला होता. ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटवरुन हे दोघे एकमेकांना भेटले होते, त्यानंतर त्यांचा विवाह झाला होता.
लग्नानंतर आरती पती सासू-सासरे व नणंद या सर्वांसह कोपरखैरणे सेक्टर-२०मधील श्री रावेची अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहत होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरकडील मंडळीनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.सोमवारी सासू आणि नणंदने आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार आरतीच्या भावाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.
COMMENTS