नाशिक / नगर सहयाद्री माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झालेल्या चुकांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दुरुस्ती केली जाणार असून नाशिककर...
नाशिक / नगर सहयाद्री
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झालेल्या चुकांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दुरुस्ती केली जाणार असून नाशिककरांची वाहतूक कोंडीतून होणार आहे.नाशिक मुंबई महामार्गाच्या बांधकामावरून माजी मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रंगली टोलेबाजी.नितीन गडकरी यांनी महामार्ग कॉंक्रेटीकरण करण्याची घोषणा केली रस्ता झाला नाही अशी टीका भुजबळ केली होती.त्याला उत्तर देतांना भुजबळांच्या काळात झालेल्या कामातच चुका होत्या आधीच मोठा रस्ता केला असता तर हि वेळ आली नसती असा टोला गकडकरींनी लगावला.
गडकरी यांनी मुंबई नाशिक असा कारने प्रवास करावा,अन्यथा जाताना हेलिकॉप्टरमधून रस्त्याची पाहणी करावी, असे भुजबळ म्हणाले. यूपीआयच्या काळामध्ये ज्यावेळेला नाशिक मुंबई महामार्गाचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीपुढील काही वर्षांत दोन्ही बाजूने एक एक लेन वाढविण्यात येईल, नंतर वेळोवेळी डागडुजी होईल, असा आराखडा तयार करण्यात आला. मात्र तसे झालं नाही, आणि नाशिक मुंबई रस्त्याची वाट लागली. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहा तासांत माणूस येऊ शकत नाही. रस्त्याच्या दुरवस्थेने परिसीमा गाठली, वाहन छावण्या योग्य रस्ता नाही महामार्ग म्हणावा असा रस्ता नाही, निदान हेलिकॉप्टर मधून जाताना रस्ता बघावा , काँक्रीटीकरण होत नाही तोपर्यंत रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा अधिकारी कंपनी कार्यलयात धडकणार असल्याचा इशारा दिला होता
नाशिक मुंबई महामार्गावरून गडकरींनी भुजबळांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी १५ डिसेंबर रोजी केलेल्या या टीकेला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर देत भुजबळ आज कार्यक्रमाला उपस्थित हवे होते,अशी टिपणी ही केली. नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या जवळपास १८३० कोटी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नितीन गडकरी यांच्याहस्ते इगतपुरीमध्ये संपन्न झाला. यावेळी गडकरी यांनी नाशिक मुंबई महामार्ग सहा पदरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्याची घोषणा केली.
नाशिक मुंबई महामार्गाचे भुजबळ हे सार्वजनिक मंत्री असताना या महामार्गाचे काम पूर्ण झाले. या रस्त्याच्या डिझायन मध्ये अनेकचुका होत्या. तेव्हाच रस्ता सहा लेनचा केला असता तर अडचण आली नसती, असा टोला गडकरी यांनी लगावला.एकीकडे भुजबळांच्या काळात झालेल्या चुका अधोरेखित करतानाच त्या दुरुस्त करण्याच्या सूचनाही गडकरी यांनी केल्यात.नाशिक मुंबई महामार्गाला इंदिरानगर आणि राणेनगर परिसरात अंडरपास आहे,मात्र अंडरपासला लागून असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीपेक्षा अंडरपास छोटा आहे.त्यातच मुंबईकडून नाशिक शहरात येणाऱ्या आणि नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी अंडरपासच्या तोंडावरच रॅम्प असल्यानं दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होते.
इंदिरा नगर बोगदा पासून केलेला बोगदा असून यात वाहतूक समस्या अंडरपास, रस्त्याची एकूण परिस्थिती काय आहे, हे लक्षात येईल.यासह द्वारका सर्कल ते नाशिकरोड या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपूल बांधणे, सुरत चेन्नई महामार्ग, मोट्रोच्या कामाला गती देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्यानं शिंदे फडणवीस सरकारच्या काळात नाशिकला मोठे प्रकल्प सुरु करण्याचे संकेत गडकरी यांनी दिलेत.
COMMENTS