मुंबई । नगर सह्याद्री - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरू ह...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे.
नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे. परंतु तसे होत नाही. साधारणपणे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरु होते. परंतु यावेळी थोड्या उशिरा म्हणजे १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होणार आहे.
दरम्यान, कामकाजाचा पहिला आठवडा हा अनेक वादग्रस्त प्रकरणे आणि राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चांवर जाईल. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा असेल. तर, दुसऱ्या आठवड्यात अधिकाधिक शासकीय कामकाज असेल. त्यामुळे पहिला आठवडा सभागृहात आणि बाहेर देखील लक्षवेधी असेल.
COMMENTS