मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण आता ...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून झालेल्या महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे.
महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहे. घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी केली आहे.
मोर्चा काढू नये असे वाटत होते तर राज्यपालांना हटवायला हवे होते. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती मात्र अजून पर्यंत ती कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
शनिवारी निघणाऱ्या मोर्चाला कार्यकर्ते नक्कीच येतील. हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. पण जनता तोंडाला कुलूप लावून बसलेली नाही. जनता 17 तारखेला घोषणा देईल, गर्जना करेल. या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जाईल, असा दावाही राऊतांनी केला आहे.
COMMENTS