मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे. ज्यांच्यात...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे. ज्यांच्यात कर्तुत्व नाही, काही करायची ताकद नाही मग न्यूनगंडा प्रमाणे वागतात. दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा,नेते चोरायचे हे काम सध्या सुरु आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात टोळींचे सरकार आहे. आज ते आरएसएस कार्यालयात गेले होते. आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? यांची बुभुक्षित नजर वाईट आहे. आम्ही अनुभव घेतला आहे. ज्यांना स्वत: काही करण्याची धमक नसते, कुवत नसते ते दुसर्यांच्या गोष्टींवर हक्क सांगतात. आरएसएसने काळजी घ्यावी. दुसर्यांचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरी करण्याचे काम यांचे सुरू आहे. असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
सहा महिन्यांत राज्य सरकारने काय केले? संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही काय देणार? 52000 कोटी तुम्ही कसे वापरणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. विदर्भाला काय देणार याचे उत्तर अजून आले नाही. उद्योग इतर राज्यात गेले, तर तरुणांना रोजगार संधी कशी मिळणार याचे उत्तर अजून आले नाही.
हिवाळी अधिवेशन असूनही सत्ताधार्यांना विरोधकांनी घाम फोडला. मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे. आरोप झाल्यावर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना क्लिनचिट द्यायची अशी काही योजना आहे का? असा प्रश्नांचा भडिमार उद्धव ठाकरेंना केला.
सरकारला युवा शक्तीची ताकद अजून कळली नाही. मुंबई केंद्रशाशित करा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत ते कुणाच्या पक्षाचे आहे. भाजपचा हा डाव आहे ते आता पोटातून ओठावर आल आहे.
मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर घात कसा करणार हे समोर आले आहे. मुंबई कुणाच्या हाती सुरक्षित हे मुंबईकरांना माहित आहे.असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS