मुंबई । नगर सह्याद्री - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर सासरवाडी आहे. त्याच्या सासरवाडीलाच सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहे. त्य...
मुंबई । नगर सह्याद्री -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर सासरवाडी आहे. त्याच्या सासरवाडीलाच सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शहा यांनी ठोस भूमिका घ्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमावादावर दिल्लीत चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी अशी खोचक टीका केली. राऊत म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. सीमेवरील ५६ गावांत कर्नाटक पोलिस धुडगूस घालत आहेत. गेल्या ७० वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे.
COMMENTS