मुंबई । नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्...
मुंबई । नगर सह्याद्री -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर फोन करून धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांचा नुकताच 12 डिसेंबर रोजी जन्मदिन साजरा झाला होता. शरद पवारांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना हा धमकीचा फोन आला असल्याची चर्चा सुरू आहे. धमकीचा फोन नेमका कुणी केला आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अज्ञात व्यक्तीने फोनवरून पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली असून पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाताविरोधात भादंवि कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS