नवी दिल्ली । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मातृशोक झाला आहे. आज पहाटे त्यांच्या आईचे निधन झाले वृद्धपकाळाने हे निधन झाले ...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मातृशोक झाला आहे. आज पहाटे त्यांच्या आईचे निधन झाले वृद्धपकाळाने हे निधन झाले आहे. मातोश्री हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या कामावर परतले आहे. अहमदाबादमध्ये सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी आईच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला आहे. यानंतर अहमदाबादमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात ते सामील झाले आहे. हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेनला त्यांनी हिरवा झेंडाही दाखवला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हा दिवस तुमच्यासाठी वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या मातोश्री म्हणजे आमच्याही आई. देव तुम्हाला तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे बळ देवो. मी तुम्हालाही थोडी विश्रांती घेण्याची विनंती करते
मोदी म्हणाले- बंगालच्या पवित्र भूमीला सलाम. वैयक्तिक कारणांमुळे मी तुमच्यामध्ये येऊ शकलो नाही. याबद्दल मी माफी मागतो. रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. वंदे भारत ट्रेनसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. काही काळानंतर गंगाजीची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पश्चिम बंगालकडे सोपवण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, माननीय पंतप्रधान, आज तुमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे. तुमचे मोठे नुकसान झाले आहे. देव तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. तुम्ही येथे येणार होता. पण तुमच्या आईच्या निधनामुळे तुम्ही येऊ शकला नाही. तरीही तुम्ही या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सामील झालात. तुम्ही वंदे भारत ट्रेन येथे लाँच केली यासाठी पश्चिम बंगालच्या सर्व लोकांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छिते.
COMMENTS