हेल्थ । नगर सह्याद्री - सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी सहज वापरली जायची परंतु, बदलेल्या काळानुसार ती लुप्त ...
हेल्थ । नगर सह्याद्री -
सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी सहज वापरली जायची परंतु, बदलेल्या काळानुसार ती लुप्त झाली आहे. आज्जी - आईच्या काळात तांब्याची भांडी पाहायला मिळायची पण त्याचा आपल्या आरोग्याशी देखील संबंध येतो.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत असे आपण बरेचदा आपल्याला घरातल्यांकडून ऐकत आलो आहोत. परंतु, अनेकांना प्रश्न पडतो की, हिवाळ्यातही तांब्याची भांडी वापरायची का?
खरे तर आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात थंडीमुळे होणारे अनेक आजार दूर होतात. या काळात पाणी थंड असते.त्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने ते संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच हिवाळ्यात तांब्याची भांडी वापरावीत.याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
1. हाडेदुखीत फायदेशीर :
हिवाळ्यात प्रत्येकाला ज्या समस्येला सामोरे जावे लागते ती म्हणजे हाडे आणि सांधेदुखी. अशा स्थितीत तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने हा त्रास दूर होतो. तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे, ते वेदना कमी करण्यास मदत करतात.
2. सांधेदुखीमध्ये फायदेशीर :
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रासही खूप होतो. अशावेळी सांधेदुखीच्या रुग्णाने सकाळी लवकर तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. यामुळे सांधेदुखीत आराम मिळतो. रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते आणि शरीराची अनेक रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
3. लोहाची कमतरता:
तांब्याच्या भांड्यात अन्न किंवा पिण्याचे पाणी घेतल्याने लोहाचे शोषण आणि पेशी तयार होण्यास मदत होते.
4. हृदयाच्या समस्या:
तांब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. असे गुणधर्म त्यात आढळतात, म्हणूनच हृदयविकार बरा करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे.
5. त्वचेसाठी फायदेशीर :
तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात मेलेनिन तयार होण्यास सुरुवात होते. याशिवाय तांब्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा (Skin) वरचा थर आणखी चांगला होतो.
6. पचनक्रिया निरोगी :
तांब्याच्या भांड्यांच्या वापराने तुमची पचनक्रियाही सुधारते, कारण तांबे बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात. पोट साफ करण्याचे काम करते. यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्याचे नियमन करते.
तांब्याच्या भांड्यात हे पदार्थ खाऊ नका
तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. यासोबतच आंबट वस्तू किंवा आंबट फळांचा रस पिऊ नये. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते.
COMMENTS