मुंबई । नगर सह्याद्री - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधासभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे...
मुंबई । नगर सह्याद्री -
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधासभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवले आहे. ते जयंत पाटलांना द्यायला हवे होते. येत्या २०२४ निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
इतकंच नाही तर, ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती. असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्याचबरोबर माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. अजितदादा कधी रडतात तर कधी ८-८ दिवस फोन बंद करून पळून जातात, असा घणाघातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. 'सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले आहे. त्यांनी सांगितले आहे. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या इशाऱ्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराच देऊन टाकला. चंद्रशेखर बानकुळे हे आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
COMMENTS