बाबुर्डीत दोन कोटी पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ सुपा | नगर सह्याद्री गावचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर मुखय्या अतिशय महत्वाचा आहे. सर्व ग्र...
बाबुर्डीत दोन कोटी पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
गावचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर मुखय्या अतिशय महत्वाचा आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावात विविध योजना राबवतो. त्याठिकाणी गावचा खरा विकास झालेला असतो. शासनाच्या योजना गावातील नागरिकांसाठी तळागळापर्यंत राबविण्यात पदाधिकार्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुयातील बाबुर्डी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी जलजिवन मिशन अंतर्गत दोन कोटी नळपाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश गुंड होते.आ.लंके म्हणाले की, बाबुर्डी या गावाने तालुयात देशासाठी सर्वात जास्त सैनिक दिले. सैनिक माझे बांधव देशसेवा करत असताना आपल्या कुटुंबाचा गावचा त्याग करून सिमेवर लढतो पाठीमागे त्यांच्या कुटुंबाची सेवा खर्या अर्थाने आपण केली पाहीजे. याचाच एक भाग म्हणून गावासाठी शाश्वत नळपाणीपुरवठा योजना व्हावी ही ग्रामपंचायतीची गेली अनेक दिवसापासूनची मागणी मी सत्यात उतरवू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. आज गावासाठी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.यावेळी बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड म्हणाले की, गाव हे नवीन एमआयडीसी जापनीज झोन सुपा यालगत असल्या कारणाने शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे व सक्षम पाण्या अभावी गावाला उन्हाळ्यामध्ये नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बाबुर्डी ग्रामपंचायतच्या सततच्या मागणीनुसार आमदार लोकनेते निलेश लंके यांनी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेत बाबुर्डीचा सामावेश केल्याने पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटीचा भरीव असा निधी मंजूर झाला. या निधीतून बाबुडी येथे ६५ हजार लिटर क्षमतेची टाकी तसेच गावठाण, माळवाडी, गारकर मळा, शिवाजीनगर, जगताप मळा, ठुबेवाडी ,मांजरखोप, चिंचेच्या मळा, समान मळा, टोकवाडी, दत्तनगर इतर वस्त्यांना पाणी वितरण व्यवस्था त्याचप्रमाणे बाबुर्डी येथे साठ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घरोघरी पाणी वितरण व्यवस्था वीज कनेशन आधी कामे पार पडणार आहेत पाणीपुरवठा योजनेसाठी मोठा निधी मंजूर झाल्याने आमदार लोकनेते निलेश लंके यांचे सरपंच गुंड यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.यावेळी सचिन आप्पा पठारे, पोटघन मेजर, उपसरपंच ईश्वर दिवटे पाटील, रवींद्र गवळी, माजी सरपंच रमेश गवळी, सोमनाथ दिवटे, माजी सरपंच बाळासाहेब गारकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ गवळी, माजी उपसरपंच गोरक्ष दिवटे, गणेश ठुबे, लाला भोंडवे, अमोल दिवटे, श्याम लगड, अशोक दिवटे, रणजीत दिवटे, प्रकाश दिवटे, सुभाष ठुबे, बाबासाहेब गवळी, संदीप मगर, भोयरे गांगर्डाचे माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, ग्रामपंचयत सदस्य किशोर रसाळ, रोहिदास गुंड, श्रीकांत जगताप, मंगेश ठुबे, महेश लगड, किशोर लगड, संदीप ठुबे, संतोष पिसे, आतिश साबळे, श्रीरंग गवळी, देविदास गवळी, वामन बारवकर, एकनाथ जगताप, लाला दिवटे, गणेश दिवटे, भाऊसाहेब गवळी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईसचेअरमन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS