औरंगाबाद / नगर सहयाद्री स्कूलबस शाळेच्या मागे उभी करून चालक चहा पिण्याच्या बहाण्याने बस सोडून जायचा आणि त्याचवेळी एक रिक्षाचालक स्कूलबसमध्...
स्कूलबस शाळेच्या मागे उभी करून चालक चहा पिण्याच्या बहाण्याने बस सोडून जायचा आणि त्याचवेळी एक रिक्षाचालक स्कूलबसमध्ये घुसायचा. घुसून आठ व नऊ वर्षीय तीन शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करायचा. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकांना सांगायचं नाही म्हणून धमक्या द्यायचा. मात्र घाबरलेल्या मुलींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत सापळा रचून अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला रंगेहात पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास विठ्ठलराव बनकर आणि राजू मोहन रुपेकर आरोपींची नावे आहेत.
तिन्ही मुली शहरातील एन-९ हडकोतील एका शाळेत शिकतात.तर तिन्ही मुली आरोपी राजू रुपेकर याच्या स्कूलबसमधून नियमित शाळेत जातात. दरम्यान ७ डिसेंबरला रुपेकरने शाळेच्या मागे नाल्याजवळ स्कूलबस उभी केली आणि तो निघून गेला.पण काही कामानिमित्त गेला असावा असा मुलींचा समज झाला.मात्र रुपेकर जाताच आधीपासून तेथेच असलेला रिक्षाचालक विकास बनकर स्कूलबसमध्ये घुसला आणि त्याने तिन्ही अल्पवयीन मुलींशी अश्लील बोलणे, गालांवरून ओठांवरून हात फिरविणे,असे घाणेरडे प्रकार सुरु केले.
त्यानंतर हा प्रकार घरच्यांना सांगू नये म्हणून धमकी दिलीघाबरलेल्या मुली पहिल्या दिवशी घरी फारसे काही बोलल्या नाहीत.मात्र,त्या खूप घाबरलेल्या दिसल्या.त्यात प्रियाच्या आईने तिला याबाबत विचारले,परंतु व्हॅनमध्ये एक घाणेरडा माणून येऊन बसतो,एवढेच तिने सांगितले त्याकडे दुर्लक्ष केले. हा अश्लील प्रकार सुरुच ठेवला.त्यामुळे १०डिसेंबरला तिन्ही मुलींनी शाळेत जायला स्पष्ट नकार दिला.मुली शाळेत जायला का नकार देतात, असा प्रश्न पालकांना पडला. त्यामुळे पालकांनी मुलींशी आपुलकीने बोलून त्यांना बोलते केले.तेव्हा तिघींनीही आपल्या पालकांना व्हॅनमध्ये घडत असलेल्या गैरप्रकाराबाबत माहिती दिली.
तिन्ही मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यामुळे पालकांनी १२ डिसेंबरला सापळा रचला. मुलींचे पालक शाळा परिसरात व्हॅन ज्या भागात उभी राहते त्या परिसरात लपून बसले.व्हॅन उभी राहिल्यानंतर रुपेकर निघून गेला.त्याने जाताना बनकरला इशारादेखील केला.त्यानंतर काही क्षणातच बनकर स्कूलबसमध्ये घुसला. तो मुलींशी अश्लील प्रकार करायला लागला.तेवढ्यातच पालकांनी त्याला रंगेहात पकडले. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून चोप दिला.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS