मुंबई / नगर सहयाद्री मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावात आठ महिन्यापूर्वी वाद झाला होता.या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या ...
मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावात आठ महिन्यापूर्वी वाद झाला होता.या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून गावकऱ्यांना हाताशी धरून कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.
शिंपोली येथील गावदेवी ग्रामस्थ मंडळ या नोंदणीकृत सोसायटीतील पदाधिकारी आणि काही मंडळीनी मोकल कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला.यामुळे हे कुटुंब मागील अनेक दिवसांपासून प्रचंड दबावाखाली जगत असून या घटनेविरोधात अखेर या कुटुंबाने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून बहिष्काराचा निर्णय घेणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिंपोली भागात राहणाऱ्या मोकल आणि माळी कुटुंबात वाद झाला होता.यावरून स्वाती विकी मोकल यांनी १६ एप्रिल २०२२ रोजी माळी कुटुंबाविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याचा राग मनात धरून माळी कुटुंबांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोकल कुटुंबाविरोधात कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली.
यानंतर गावदेवी ग्रामस्थ मंडळ शिंपोली या संस्थेचे पदाधिकारी पंढरीनाथ भंडारी, महेंद्र भंडारी, दामोदर म्हात्रे, मनमोहन भंडारी,सुनील पाटील, तसेच शांतीबाई किनी यांनी २२ एप्रिल या दिवशी गाव बैठक घेऊन मोकल कुटुंबातील सदस्य यांच्यावर माळी कुटुंबावरील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.तक्रार मागे घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती.
COMMENTS