अहमदनगर । नगर सह्याद्री रस्त्यांचे प्रश्न सुटावे याकरता आमदार निलेश लंके यांच्या अधिपत्याखाली उपोषण सुरू झाले, मात्र पालकमंत्री यांच्या द...
अहमदनगर । नगर सह्याद्री
रस्त्यांचे प्रश्न सुटावे याकरता आमदार निलेश लंके यांच्या अधिपत्याखाली उपोषण सुरू झाले, मात्र पालकमंत्री यांच्या दबावामुळे या ठिकाणी कोणीच प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, डॉक्टर इथे यायला तयार नाही हा एक प्रकार दडपशाही आहे असा आरोप जिल्हा परिषदचे माजी सदस्य शिवशंकर राजळे यांनी केला. दरम्यान
आमदार लंके व कार्यकर्त्यांना काही झाले तर आम्ही एकेकाला घरात घुसून मारू असा इशारा पालवे यांनी यावेळी दिला.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यांच्या प्रश्नासाठी पाथर्डी शेवगावचे कार्यकर्ते आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले आहेत. परंतु आम्ही सकाळपासून बघतोय आमरण उपोषण असून देखील केवळ पालकमंत्र्यांच्या दबावामुळे या ठिकाणी रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, अॅम्बुलन्स या ठिकाणी आलेले नाही. तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी फिरकले नाहीत.लोकप्रतिनिधी जेव्हा उपोषणाला बसतात त्यावेळेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही सरकारची असते. मात्र या ठिकाणी तसे जाणवले नाही असे राजळे यांनी म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले असताना देखील त्यांच्याही कार्यालयातून अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणी आले नसल्याने आमचे उपोषण सुरू आहे. लंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जोपर्यंत याच्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम आहोत असे ते म्हणाले. आमदार निलेश लंके हे उपोषणाला बसलेले आहेत याची कल्पना प्रशासनाला आहे. पण पालकमंत्री यांच्या दबावामुळे या ठिकाणी कोणीच यायला तयार नाही ही बाब अतिशय गंभीर आहे.
COMMENTS