पारनेर । नगर सह्याद्री टाकळी ढोकेश्वर येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टाकळी ढोकेश्वर येथील न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये चर्...
पारनेर । नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टाकळी ढोकेश्वर येथील न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना ख्रिस्तजन्माचा संदेश दिला. यावेळी परिसरातील सर्व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
24 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 25 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता भक्ती घेऊन बायबल वाचन पठण करून पास्टर विनोद गायकवाड व पास्टर दादाभाऊ बागुल यांनी सर्वांना ख्रिस्तजन्माच्या संदेश दिला. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी देखील चर्च मध्ये उपस्थित राहून समस्त ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी चर्चला सजावट करून आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती. सायंकाळच्या वेळी गावातील सर्व लोकांसाठी अल्पोपहार व फराळाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी सचिन आल्हाट, गणेश आल्हाट, सुबोध गायकवाड, प्रमोद गायकवाड, राहुल अल्हाट, योहान गायकवाड, संतोष गायकवाड, सचिन मिसाल, संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड, यांच्या सह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पास्टर विनोद गायकवाड, पा. दादाभाऊ बागुल यांनी सर्वांचे आभार मानले
COMMENTS