नाशिक / नगर सह्याद्री नाशिक शहरात चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र आज झालेल्या चोरीत चोरटे चोरी करून फसल्याची घटना समोर आली आहे.नाशिक ...
नाशिक / नगर सह्याद्री
नाशिक शहरात चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र आज झालेल्या चोरीत चोरटे चोरी करून फसल्याची घटना समोर आली आहे.नाशिक शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी केल्यानंतर दागिने नकली असल्याचे समोर आल्यानंतर चोरांचा पोपट झाला.
नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.यामुळे नागरिकांसह पोलिसांना देखील चोरटयांनी आव्हान दिले आहे.असे असताना नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात चोरीची घटना घडली आहे.बिटको चौक परिसरात असलेल्या ज्वेलर्स शॉपमधून नियोजन करून चोरी केली.त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. मात्र चोरटयांनी जेव्हा चोरलेले दागिने निरखून पाहिले असता त्यांचा पोपट झाल्याचे त्यांना समजले.चोरी केलेले दागिने नकली असल्याचे लक्षात येताच चोरांनी तोंडावर हात मारून घेतला.
बिटको चौकात असलेल्या उड्डाणपुलाजवळ जलधारा बिल्डिंगमध्ये काजळे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. एका टोळीने मोठी मेहनत घेत बाहेरील लोखंडी दरवाजा तोडत दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला.दुकानातील सोन्याचे डुप्लिकेट दागिने तसेच वनग्राम व काही चांदीचे दागिने असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.मात्र एवढी मेहनत घेतल्यानंतर त्यांच्या हाती फक्त पंधरा हजार रुपयांचे एक ग्रॅमचे नकली दागिने लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.आरोपींनी वापरलेली गाडी औरंगाबाद येथील असल्याचे समजते.गाडीचा नंबर सुद्धा पोलिसांना मिळाला आहेपोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
COMMENTS