नाशिक / नगर सहयाद्री 'तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल सर्वाना सॉरी, यश आईवडिलांचं नाव मोठं कर, काका मावशी सर्वांची काळजी घ्या' अशा आश...
नाशिक / नगर सहयाद्री
'तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल सर्वाना सॉरी, यश आईवडिलांचं नाव मोठं कर, काका मावशी सर्वांची काळजी घ्या' अशा आशयाचा मजकूर लिहीत नाशिकमध्ये नवदाम्पत्याने जीवन संपवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी चिठ्ठीत लिहिलेल्या दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक विवंचनेला कंटाळून इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली.पैशांचा तगादा लावल्यामुळे या पती पत्नीने जीवनयात्रा संपविल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती.त्याचबरोबर आत्मह्त्येदरम्यान या दोघांनी सुसाईड नोट लिहीत दोघं संशयितांची नावे नमूद केली होती.या दोघा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली आहे मात्र दोघा नवरा बायकोने घेतलेल्या अशा टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर पाथर्डी फाटा परिसरात गौरव जितेंद्र जगताप,नेहा गौरव जगताप वास्तव्यास होते.गौरव हे सातपूर येथील खासगी कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती.त्यामुळे तो तणावात होता.दरम्यान रविवारच्या दिवशी नेहाला तिच्या मावशीने फोन केला होता.मात्र तिने फोन उचलला नाही,म्हणून त्यांनी गौरवचा भाऊ यश जगताप यास फोन करुन गौरव आणि नेहा फोन उचलत नसल्याचे सांगितले.सिडकोत राहणाऱ्या यश हा भाऊ गौरव व नेहा यांना बघण्यासाठी अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीतील त्यांच्या घरी पोहोचला.
दरम्यान घराचा दरवाजा बंद असल्याने त्याने दरवाजा वाजविला, आवाज दिला मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यश व त्याचे काका अरुण गवळी यांनी सोसायटीतील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा गौरव व नेहा या दोघांनी हॉलमधील सिलिंग हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना सुसाईड नोट मिळून आल्याने खळबळ उडाली. आर्थिक विवंचनेत असल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलले, असल्यासे पोलीस तपासात समोर आले.पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS