नाशिक / नगर सहयाद्री एचआयव्ही बाधित व्यक्तींनाही जगण्याची ईच्हा आसते पण साजात आशा लोकाना तुच्छ सजले जाते त्याच्या भावनाचा ही खेळ होत आसतो. ...
नाशिक / नगर सहयाद्री
एचआयव्ही बाधित व्यक्तींनाही जगण्याची ईच्हा आसते पण साजात आशा लोकाना तुच्छ सजले जाते त्याच्या भावनाचा ही खेळ होत आसतो. समाजात त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोणही फार चांगला दिसून येत नाही.एचआयव्ही बाधित व्यक्ती म्हंटलं तर अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतात.अशा जिवनाला कलाटणी देत नाशिक मध्ये सात जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला.
एचआयव्ही बाधित व्यक्तींनाही जगण्याची इच्छा असते, पण ते नैराश्यात अडकून पडतात आणि प्रवाहापासून दूर निघून जातात.एचआयव्ही आजाराशी दोन हात करत असतांना अनेक जणांना जीवन जगण्याचा कंटाळा येत असतो, त्यात मात्र काही दोडप्यांना त्याला फाटा देत नवीन आयुष्य सुरू केले आहे.नाशिकमध्ये नुकतेच सात जोडप्यांनी लग्नगाठ बांधून नव्या संसाराची सुरुवात केली आहे, नाशिकमधील विविध सामाजिक संस्थांनी यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
एचआयव्ही झालेल्या अनेकांनी त्र्यंबक नाका येथे झालेल्या वधू-वर मेळाव्यात सहभाग घेतला होता, त्यात सात विवाह जुळले आणि त्यांचा विवाह देखील पार पडला.एचआयव्ही बाधित असलो तरी काय झालं आम्हालाही जीवन जगायचे आहे, असे म्हणत या जोडप्यांनी नवा संसार थाटत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.एचआयव्ही बाधित व्यक्ती म्हंटलं तर अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतात.पण नुकताच एचआयव्ही बाधित व्यक्तींचा वधूवर परिचय मेळावा नाशिकमध्ये पार पडला आहे.
विशेष म्हणजे आठवा मेळावा पार पडला आहे. नाशिक नेटवर्क, प्रेम फाउंडेशन, तुळसाई संस्था, राष्ट्र सेवा दल, जिव्हाळा संस्था यांनी एकत्रित हा मेळावा घेतला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात ७ जोडप्यांची लग्नगाठ बांधली गेली आहे. राज्यातील विविध भागातून जवळपास शंभरहून अधिक एचआयव्ही बाधित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. नाशिकमधील विविध सामाजिक संस्थांच्या मंडळींनी पुढाकार घेत एचआयव्ही बाधित व्यक्तींचा विवाह केल्यानं चर्चेचा विषय ठरत आहे.
एचआयव्ही झालेल्या अनेकांनी त्र्यंबक नाका येथे झालेल्या वधू-वर मेळाव्यात सहभाग घेतला होता, त्यात सात विवाह जुळले आणि त्यांचा विवाह देखील पार पडला.एचआयव्ही बाधित असलो तरी काय झालं आम्हालाही जीवन जगायचे आहे, असे म्हणत या जोडप्यांनी नवा संसार थाटत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
COMMENTS