नवी दिल्ली । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची भाषा करणारे मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यां...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची भाषा करणारे मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांना मंगळवारी पहाटे ५.३० वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पटेरिया त्यांचे मूळ गाव दमोह येथे होते. येथूनच पोलिसांनी त्यांना अटक केली. ११ डिसेंबरला झालेल्या सभेत पटेरिया यांनी ‘लोकशाही वाचवायची असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे’ असे वक्तव्य केले होते. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सोमवारी पटेरिया यांच्यावर एफआयआर करण्याचे निर्देश दिले. यानंतर पन्ना येथील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेरिया यांनी सोमवारी रात्री आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. दुसरीकडे काँग्रेस त्यांना नोटीस बजावू शकते. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. काँग्रेस पटेरिया यांना नोटीस बजावू शकते, असेही बोलले जात आहे.
COMMENTS