नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजना...
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली. मोदी बैठकीत दाखल झाले तेव्हा संसदीय मंडळाच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून गुजरातमधील विजयाबद्दल त्यांचे स्वागत केले. या स्वागताच्या सुमारे तीन मिनिटे टाळ्या वाजत होत्या.
भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षावर काँग्रेसने विरोधी पक्षांची उच्चस्तरीय बैठक बोलावली. तवांगवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षांशी चर्चा करत आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी म्हटले, संरक्षणमंत्री निवेदन वाचून बाहेर पडले. ते चर्चा करायलाही तयार नव्हते. राजीव गांधी फाउंडेशन प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. यात आमचा काही दोष असेल तर आम्हाला फाशी द्या. आम्हाला खुलासा करण्याची संधी दिली जाईल, असे उपसभापतींनी सांगितले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. ते आमचे ऐकायला तयार नव्हते आणि हे देशासाठी चांगले नाही, असे खरगे म्हणाले.
COMMENTS