कोठी परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री शहरातील प्रभाग ११ मधील कोठी परिस...
कोठी परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्रीशहरातील प्रभाग ११ मधील कोठी परिसरात रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून नवीन रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती. या कामासाठी नगरसेवक नजीर शेख ऊर्फ नज्जू पहिलवान व नगरसेविका रूपाली पारगे - कदम यांनी माझ्याकडे निधीची मागणी केली होती. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामामुळे प्रभागातील नागरिकांना चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. प्रभागातील नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना आवश्यक सहकार्य निधीच्या माध्यमातून करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कोठी परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक नज्जू पहिलवान, अविनाश घुले, रूपाली पारगे - कदम, विनोद दादा कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, जोसेफ पारगे, राहूल उमाप, शामराव उमाप, अतुल शिंदे, आकाश साळवे, सचिन जाधव, सुधीर शिंदे, चिकुभाऊ गायकवाड, अशोक पारधे, पा. दिपक थोरात, एजाज सय्यद, इम्रान जहागीरदार, झहीर शेख, हाजी वाजीद जहागीरदार आदींसह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका रुपाली पारगे म्हणाल्या, प्रभागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
COMMENTS