वाळकी, सारोळा, कापूरवाडी, नांदगाव, शेंडी, नेप्ती दणदणीत विजय अहमदनगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे नेते...
वाळकी, सारोळा, कापूरवाडी, नांदगाव, शेंडी, नेप्ती दणदणीत विजय
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे नेते शिवार्जी कर्डिले यांना प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे. जवळपास १८ गावांमध्ये कर्डिले गटाचा वरचष्मा आहे. पांगरमलमध्ये गड आला पण सिंह गेला. सरपंचपदाचे उमेदवार बापूसाहेब आव्हाड पराभूत झाले.
नगर तालुक्यात झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८० टक्क्यांवर मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात कर्डिले गटाला १८ गावांत सत्ता मिळविता आली. आमदार नीलेश लंके, शिवसेनेचे शशिकांत गाडे, काँग्रेसचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या ताब्यात ९ ग्रामपंचायती गेल्या. सारोळ्यात पंचायत समितीचे सदस्य बंडू कडूस यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले होते. तरी त्यांना सत्ता राखण्यात यश आले.
नेप्तीत अरुण होळकर गटाचा दारुण पराभव झाला. रांजणीत बाळासाहेब चेमटे गटाचा दारुण पराभव झाला. कौडगाव बाबासाहेब खर्से गटाचा पराभव झाला. टाकळीमध्ये शिक्षक रा. वी. शिंदे गटाचा दारुण परावभ झाला. पांगरमलला गड आला पण सिंह गेला. सरपंचपदाचे उमेद्वार बापूसाहेब आव्हाड पराभूत झाले. अमोल आव्हाड सरपंच झाले. वाळकीत शरद बोठे यांनी सत्ता राखली. राळेगण म्हसोबात सुधीर भापकर यांनी सत्ता राखली. नारायण डोहोमध्ये परिवर्तन झाले असूून शंकर साठे यांच्या ताब्यात सत्ता गेली. बाबुर्डी बेंदमध्ये माजी सरपंच सुनील खेंगट यांनी सत्ता राखली.
COMMENTS