मीरा रोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या चार मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो २८ वर्षांपासून फरार होता.
मुंबई / नगर सह्याद्री -
मीरा रोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या चार मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो २८ वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने महिला आणि तिच्या मुलांची हत्या केली होती.
मीरा भाईंदर-वसई विरार (एमबीवीवी) गुन्हे शाखेने फरार आरोपी राजकुमार चौहानला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर मीरा रोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या चार मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. परदेशात नोकरीसाठी निघाले असताना मुंबई विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी राजकुमार हा १९ वर्षांचा होता. त्याला महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र तसे न झाल्याने त्याने इतर आरोपींसोबत मिळून गुन्हा केला. या हत्येतील अन्य दोन आरोपी अनिल सरोज आणि सुनील सरोज हे अद्याप फरार आहेत.
COMMENTS