महाराष्ट्रातील नाशिक येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील नाशिक येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यापैकी ५५-६० जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत, तर इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धर्मगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या सुमारे १००-१२५ विद्यार्थ्यांनी बुधवारी कॅन्टीनचे जेवण घेतल्यानंतर मळमळ आणि पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर त्यांना कॅम्पस रुग्णालयात दाखल करण्यात आले,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्टीन चालवण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे आहे. या घटनेचा मेडिको-लीगल केस (एमएलसी) म्हणून तपास केला जात आहे.
COMMENTS