मुंबई । नगर सह्याद्री - राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या...
मुंबई । नगर सह्याद्री -
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांच्या पुण्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महापुरूषांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात सुद्धा घेतले आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्याचंही निलंबन करण्यात आले आहे. 'शाईफेकीचा हा कट पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहे. असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला होता.
'माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही, पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का?' असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला होता.
चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या आहे. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली आहे. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०/१० कोटी रुपये देणारे लोक आहे.
त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येत आहे.
COMMENTS