नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या विकास निधीतून घुमरेगल्ली येथील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ अहमदनगर । नगर सह्याद्री नगर शहरातील प्रत्येक भ...
नगर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार कामे प्राधन्याने करण्यात येत आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कामे सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कामांना गती देण्यात आली असून, प्रश्न सुटत आहेत. प्रभाग 12 मधील नगरसेवकांचा प्रभागातील कामांसाठी विशेष पुढाकार असतो. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. नागरिकांना सेवा देण्यात तत्पर नगरसेवक म्हणून ते परिचित आहे. नागरिकांनीही आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही सर्व एकत्रित त्या सोडवू, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्र.12 मधील घुमरेगल्ली येथील प्रवरा बँकेजवळील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, गणेश वैकर, महेश शेटे, शरद सौदेकर, उदय वायकर, अवधुत गुरव, श्रेयश वैकर, अनंत वैकर, धनश्री वैकर, सुनिता शेटे, नेवासकर, बोरा, मंदार लोखंडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, प्रभाग समस्या मुक्त व्हावा, यासाठी सातत्याने विविध कामांसाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहे.
नागरिकांना मुलभुत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असून त्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधला जात असल्याचे सांगितले. यावेळी परेश लोखंडे यांनीही प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी नगरसेवकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. नागरिकांच्या प्रश्न, समस्या तातडीने सुटत असल्याने नागरिकांही समाधान व्यक्त करत आहेत. यापुढेही असेच कामे प्रभागात होत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, दत्ता कावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत देशमुख यांनी केले तर महेश शेटे यांनी आभार मानले
COMMENTS