मुंबई / नगर सह्याद्री कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणाजवळ राहण्यास...
मुंबई / नगर सह्याद्री
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणाजवळ राहण्यासाठी पंचतारांकित व इतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.२४ वॉर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहणे, खाण्यावर तब्बल ३४ कोटी ६१लाख ११हजार ५३५ रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
कॅगकडून चौकशी होत असताना हा 34 कोटींचा प्रस्ताव प्रशासक म्हणून आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी बीएमसी विरोधी पक्ष नेत्यांकडून केली जात आहे.शिवाय या हॉटेल्सला जर प्रॉपर्टी टॅक्स त्या काळात माफ करण्यात आला तर एवढा खर्च कसा झाला? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण देत असताना सांगितले की सर्व प्रस्ताव नियमानुसार मंजूर झालेली आहे.कोरोना काळात या सगळ्या गोष्टींवर तो खर्च झालाय त्याचे प्रस्ताव मंजुरीस आल्यानंतर त्याला प्रशासक म्हणून आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सर्व व्यवहार पारदर्शकपणे झाला असून कॅगकडून बीएमसी कामांची चौकशी असताना कुठल्याही प्रकारची माहिती महापालिका देण्यास सहकार्य करेल असे मुंबई महानगपालिकेने म्हटले आहे.
COMMENTS