मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सपत्...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सपत्निक साई समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी माफी मागावी आणि आत्मक्लेष करावा अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे.
विरोधकांची मानसिक कोंडी झाली असून परस्पर विरोधी आणि बेताल विधान ते करताहेत. हिंदु धर्म, स्वधर्म यासाठी छ. संभाजी महाराजांनी बलिदान दिले आहे. अजित पवारांना हे कळायला हव की ते धर्मवीर आहे. अजीत पवार यांनी वक्त्याबद्दल माफी मागावी आणि आत्मक्लेष करावा. मधल्या काळात शरद पवार यांनी देखील आक्षपार्ह विधान केले आहे.
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा घणाघात देखील विखे पाटलांनी केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य गंभीरतेने घेण्याची गरज नाही. मागिल लोकसभेला नीचांकी जागा काँग्रेसला मिळाल्या आहे. विरोधी पक्षनेते पदा एवढ्या देखील जागा मिळाल्या नाहीत. पुढील निवडणूकीत त्याही मिळणार नाही.
वायफळ खर्च करण्यासाठीची भाजपची भूमिका नाही असा टोला विखे पाटलांनी राहुल गांधी यांच्या बदनामी साठी भाजपने पैसा खर्च केल्याच्या वक्तव्यावर लागवला आहे. काळाच्या ओघात घटक पक्षामधील एकोपा राहीला नाही. आघाडी देखील राहील की नाही याबाबत शंका असल्याचे विखे पाटील म्हणाले आहे.
COMMENTS