नवी दिल्ली | वृत्तसंस्था संपूर्ण उत्तर भारतात नवीन वर्षाचे स्वागत जोरदार थंडीने होणार आहे. ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या पाच दिवसांत हंगामा...
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
संपूर्ण उत्तर भारतात नवीन वर्षाचे स्वागत जोरदार थंडीने होणार आहे. ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या पाच दिवसांत हंगामातील सर्वात कडायाची थंडी पडू शकते. पंजाब, हरियाणासह काही राज्यांत रात्रीचे तापमान नीचांकी होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दिल्ली, राजस्थान, पश्चिम-उत्तर प्रदेशात रात्रीचे तापमान १ ते ४ अंशांदरम्यान राहू शकते. कमाल तापमान १० ते १४ अंश सेल्सियस राहू शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तरेकडील डोंगराळ राज्यांपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि उत्तर मध्य प्रदेशातील बहुतांश भागात दाट धुके पाहायला मिळेल.
दक्षिणेकडील राज्ये वगळता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तापमानात घट नोंदवली जाईल. हवामान विभागानुसार २७ ते ३० डिसेंबरदरम्यान दिवस-रात्रीच्या तापमानात किरकोळ वाढ होईल. वार्यातही बदल जाणवेल. आतापर्यंत नैऋत्य मोसमी वारे डोंगरातून बर्फाळ वारे घेऊन वाहत आहेत. २७ पासून हवामानातील अस्थैर्यामुळे वार्यात असे बदल दिसतील. त्यामुळे दिवसाचे तसेच रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शयता आहे.
हवामान तज्ञ नवदीप दहिया म्हणाले, २९ ते ३० डिसेंबरला जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टीची शयता आहे. त्यानंतर हवेचा पॅटर्न बदलेल. त्यामुळे मैदानी प्रदेशातील थंडीचा कडाका वाढेल. हा हंगामातील सर्वात थंड काळ असेल. हवामान विभागानुसार भूमध्यसागरातील पश्चिमी विक्षोभ हिमालयीन भागात सक्रिय होईल. २९ डिसेंबरनंतर डोंगरी राज्यांत बर्फवृष्टी होईल. काही ठिकाणी पावसाचीही शयता आहे.
COMMENTS