सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून नागपूर येथे बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री नागापूर-बोल...
सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून नागपूर येथे बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्रीनागापूर-बोल्हेगाव हा परिसर नव्याने विकसित होणारा भाग आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यांना मूलभूत प्रश्नांपासून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लावली जातील. सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून बोल्हेगाव गावातील बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभागातील एका एका भागाचा नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात आहे. नागापूर-बोल्हेगाव परिसराला विकास कामातून शहरीकरणाचे रूप प्राप्त करून दिले आहे. बंद पाईप गटार व ड्रेनेज लाईन काम मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून नागापूर गावठाण भागातील बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका कमलताई सप्रे, नगरसेविका रीताताई भाकरे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, भालचंद्र भाकरे, मोहन भाकरे, भाऊसाहेब गायकवाड, पंढरीनाथ सप्रे, राधा भाकरे, सोनाली भाकरे, रोहिणी भाकरे, सोनाली कदम, कल्पना धाडीवाल, नामदेव शिर्के, बबन कोतकर, दिलीप पेटकर, शोभा मिरपगार, संगीता साबळे, मीना माने, अनिता घोरपडे, प्रभावती लांगोरे, अर्चना गायकवाड, सुनिता भाकरे, माळसा गायकवाड आदी उपस्थित होते.
सभागृह नेते अशोक बडे म्हणाले की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध आहोत. महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावले जात आहेत. नागापूर गावठाणातील अत्यंत महत्त्वाचा बंद पाईप गटार योजनेचे काम मार्गी लागले आहे. याचबरोबर रस्ता काँक्रीकरण कामाही सुरू होणार आहे. चक्रधर स्वामी मंदिर रस्ता काँक्रीटीकरण्याचे काम मंजूर असून लवकर सुरू होणार आहे याचबरोबर अंगणवाडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता ही इमारत सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. आता सनफार्मा कंपनीच्या माध्यमातून अंगणवाडीची इमारत बांधली जाणार आहे. गणेश चौक ते केशव कॉर्नर रस्त्याचे कामही महापालिकेच्या माध्यमातून सुरू होणार आहे. नागापुर- बोल्हेगाव परिसरामध्ये कामगार वर्गाच्या वसाहती मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे प्र. क्र.७ हा विकासकामंतून आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल असे ते म्हणाले.
COMMENTS