पारनेर तालुका शालेय नाटय स्पर्धेस प्रारंभ पारनेर | नगर सह्याद्री मोबाईल मुळे मुलांमधील कलाकार हरवत चाललेला असताना क्रांतिकारक सेनापती बापट...
पारनेर तालुका शालेय नाटय स्पर्धेस प्रारंभ
मोबाईल मुळे मुलांमधील कलाकार हरवत चाललेला असताना क्रांतिकारक सेनापती बापट करंडक नाटय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील कलाकार निर्माण होऊन त्याला व्यासपीठ मिळेल असे प्रतिपादन पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले.
पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळ, आडवाटेच पारनेर आयोजित पारनेर तालुका शालेय नाटय क्रांतिकारक सेनापती बापट करंडक स्पर्धा चा प्रारंभ पारनेर महाविद्यालया मधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झाला. यावेळी अध्यक्षस्थानी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर होते. पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप म्हणाले, नाटय स्पर्धा मधून घेतलेले सामाजिक विषयांमुळे समाजप्रबोधन करण्यात प्रभावी ठरणार आहे. प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर म्हणाले, शालेय नाट्य स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर टाकणारी ठरणार आहे. यावेळी नाटय स्पर्धा संयोजन समितीचे विनोद गोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील विकास प्रतिष्ठान चे प्रमुख प्रा संजय कोल्हे, सह्याद्री चे अश्विन कोल्हे,कोरठण खंडोबा देवस्थान चे उपाध्यक्ष महेश शिरोळे, आडवाटेच पारनेर चे प्रमुख प्रा. तुषार ठुबे, गायत्री चे इंद्रजित देशमुख, जेष्ठ नाट्यकर्मी निवृत्ती श्रीमंदिलकर, प्रा. संजय खोडदे, संतोष भोर, जेष्ठ नाटककार अशोक गायकवाड, कैलास श्रीमंदिलकर, गणेश कावरे, नजीर तांबोळी, शुभम फंड, फौजी ब्रदर्स चे हरिश्चंद्र व्यवहारे, सचिन गायखे, किरण शिंदे, सुहास गोरडे, शर्मिला मगर, मंगल पठारे, ज्योती थोरात, रीमा भिंगारदिवे, ज्योती देडगे, आदी उपस्थित होते.
COMMENTS